Trace Id is missing

तुमचा सेवा करारनामा अधिक स्पष्ट केला आहे

आम्ही Microsoft सेवा करारनामा अपडेट करत आहोत, जो Microsoft उपभोक्ता ऑनलाइन उत्पादने आणि सेवांच्या तुमच्या वापरास लागू होतो. आमच्या अटी स्पष्ट करण्यासाठी आणि त्या तुमच्यासाठी पारदर्शक असतील याची खात्री करण्यासाठी, तसेच नवीन Microsoft उत्पादने, सेवा व वैशिष्ट्ये व्यापण्यासाठी आम्ही या अपडेट करत आहोत.

खाली सारांश दिलेल्या या अपडेट 30 सप्टेंबर 2023 पासून लागू होतील. तुम्ही 30 सप्टेंबर 2023 रोजी किंवा त्यानंतर आमची उत्पादने आणि सेवा वापरणे सुरू ठेवल्यास, तुम्ही Microsoft सेवा करारनाम्याच्या अपडेट केलेल्या अटींना सहमती दर्शवता.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Microsoft सेवा करारनामा म्हणजे काय?

Microsoft सेवा करारनामा हा तुम्ही आणि Microsoft (किंवा त्यांच्या सहयोग्यांपैकी एक) यांच्यामधील करारनामा आहे, जो Microsoft च्या उपभोक्ता ऑनलाइन उत्पादने आणि सेवांचा तुमचा वापर संचालित करतो. व्यापलेली उत्पादने आणि सेवा यांची पूर्ण सूची तुम्ही येथे पाहू शकता.

Microsoft सेवा करारनाम्याने न व्यापलेली उत्पादने आणि सेवा कोणत्या आहेत?

Microsoft सेवा करारनामा हा व्हॉल्यूम परवाना ग्राहकांना समर्पित केलेल्या उत्पादनांना आणि सेवांना लागू होत नाही, ज्यांमध्ये उद्योग, शिक्षण किंवा शासकीय ग्राहकांसाठी Microsoft 365, Azure, Yammer किंवा Skype for Business यांचा समावेश आहे. व्यवसायासाठी Microsoft 365 ला लागू होणार्‍या सुरक्षा, गोपनीयता आणि पालनसंबंधी वचनबद्धता तसेच संबंधित माहितीसाठी, कृपया https://www.microsoft.com/trust-center/product-overview येथे Microsoft विश्वास केंद्राला भेट द्या.

Microsoft सेवा करारनाम्यामध्ये Microsoft कोणते बदल करत आहे?

आम्ही येथे सर्वात लक्षणीय बदलांचा सारांश पुरवला आहे.

सर्व बदल पाहण्यासाठी, तुम्ही पूर्ण Microsoft सेवा करारनामा वाचावा अशी आम्ही शिफारस करतो.

या अटी कधी लागू होतील?

Microsoft सेवा करारनाम्याच्या अपडेट 30 सप्टेंबर 2023 रोजी लागू होतील. त्या वेळेपर्यंत, तुमच्या सद्य अटी लागू राहतात.

मी या अटी कशा स्वीकाराव्या?

तुम्ही 30 सप्टेंबर 2023 रोजी किंवा त्यानंतर आमची उत्पादने आणि सेवा वापरून किंवा अॅक्सेस करून, अपडेट केलेल्या Microsoft सेवा करारनाम्याला सहमती दर्शवत आहात. तुम्ही सहमत नसल्यास, 30 सप्टेंबर 2023 च्या आधी उत्पादने आणि सेवा वापरणे थांबवणे व तुमचे Microsoft खाते बंद करणे निवडू शकता.