Trace Id is missing

Microsoft सेवा करारनाम्यामधील बदलांचा सारांश – 30 सप्टेंबर 2023

आम्ही Microsoft सेवा करारनामा अपडेट करत आहोत, जो Microsoft उपभोक्ता ऑनलाइन उत्पादने आणि सेवांच्या तुमच्या वापरास लागू होतो. हे पेज Microsoft सेवा करारनाम्यामधील सर्वात लक्षणीय बदलांचा सारांश पुरवते.

सर्व बदल पाहण्यासाठी, कृपया येथे संपूर्ण Microsoft सेवा करारनामा वाचा.

  1. हेडरमध्ये, आम्ही प्रकाशनाची तारीख 30 जुलै 2023 आणि लागू होण्याची तारीख 30 सप्टेंबर 2023 अशी अपडेट केली आहे.
  2. आपली गुप्तता या विभागामध्ये, तुम्ही आमच्या AI सेवांचा वापर करून तयार केलेला आशय समाविष्ट करण्यासाठी आम्ही "आपली सामग्री" च्या व्याख्येचा विस्तार केला आहे.
  3. आचारसंहिता या विभागामध्ये, आम्ही AI सेवांचा वापर संचालित करण्यासाठी भाषा जोडली आहे.
  4. सेवा आणि समर्थन वापरणे या विभागामध्ये, आम्ही पुढील गोष्टी जोडल्या आहेत:
    • वापरकर्त्यांना या पद्धती अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करण्यात आणि समजून घेण्यात मदत करण्यासाठी आम्ही नियंत्रण आणि अंमलबजावणी विभाग जोडला आहे.
    • दूरसंचार ग्राहक संरक्षण संहितेच्या अधीन असलेली वस्तू किंवा सेवा वापरणाऱ्या ऑस्ट्रेलियन ग्राहकांना दिलेले अधिकार दर्शवण्यासाठी आम्ही एक विभाग जोडला आहे, जो ग्राहकांना त्यांच्या वतीने Microsoft सोबत व्यवहार करण्यासाठी वकील किंवा अधिकृत प्रतिनिधी नियुक्त करण्याची अनुमती देतो.
  5. कंत्राट करणारे आस्थापन, कायद्याची निवड व वाद सोडविण्यासाठीचे स्थान या विभागामध्ये, Microsoft Teams च्या विनामूल्य भागांसाठी करार करणारी संस्था ऑस्ट्रेलियाकरिता अपडेट केली गेली आहे.
  6. सेवा-विनिर्दिष्ट अटी या विभागामध्ये, आम्ही पुढील भर घातली आहे आणि बदल केले आहेत:
    • Microsoft खाते प्रमाणीकरणामार्फत या उत्पादनासाठी चाचणी साइन-अप सुरू केली जाऊ शकत असल्यामुळे, आम्ही Dynamics 365 चा संदर्भ जोडला आहे.
    • वापरकर्ता परवाना तरतुदी स्पष्ट करण्यासाठी आम्ही Bing Places विभाग बदलला आहे, ज्यामुळे उत्पादनाला त्याच्या कार्यात्मक आवश्यकतांची पूर्तता करता येईल.
    • आम्ही “Microsoft Storage” नावाचा नवीन विभाग तयार केला आहे, ज्यामध्ये OneDrive आणि Outlook.com या दोन्हींचा समावेश आहे तसेच तो ब्रँडिंगमधील बदल दर्शवतो. हे त्या Outlook.com अटॅचमेंटमधील स्टोरेज कोटाचे सध्याचे स्टेटस दर्शवते, जे आता OneDrive स्टोरेज कोटा, त्याचप्रमाणे Outlook.com स्टोरेज कोटा यांमध्ये मोजले जाते. अधिक माहिती असलेल्या पेजची लिंकदेखील पुरवली जाते.
    • जागतिक प्रोग्राम रोलआउटच्या समर्थनात अतिरिक्त शब्द जोडण्यासाठी, Microsoft खाते वापरकर्त्यांच्या स्वयंनोंदणीसाठी आणि प्रोग्राममधील इतर बदलांकरिता समर्थन जोडण्यासाठी व कार्यक्रमाबाबत अतिरिक्त स्पष्टता जोडण्यासाठी शब्द जोडण्याकरिता आम्ही Microsoft Rewards हा विभाग स्पष्ट केला आहे.
    • ठरावीक निर्बंध, आपली सामग्री चा वापर आणि AI सेवांच्या वापराशी संबंधित आवश्यकता नमूद करण्यासाठी, आम्ही AI सेवांमध्ये एक विभाग जोडला आहे.
  7. सूचना या विभागामध्ये, आम्ही ठरावीक परवाने आणि पेटंटचे सूचना स्टेटस अपडेट करण्यासाठी संपादने केली आहेत.
  8. संपूर्ण अटींमध्ये, स्पष्टतेमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि व्याकरण, मुद्रणदोष व त्यांसारख्या समस्या हाताळण्यासाठी, आम्ही बदल केले आहेत. आम्ही नामकरण आणि हायपरलिंकदेखील अपडेट केल्या आहेत.